पावसामुळे भुसावळ बस स्थानकाला तलावाचे स्वरूप

प्रवाशांना सहन करावा लागतोय मोठा मनस्ताप

Ancr जळगाव एस टी विभागातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या भुसावळ बस स्थानकाची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून बसस्थानकाला अक्षरशा तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे . बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एसटी चालकांनाही यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत असून प्रवासात नाही बस स्थानकातून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, पावसामुळे सातत्याने ही अडचण निर्माण होत असून देखील एसटी प्रशासनाकडून यावर कुठलीही उपाय योजना केली जात नाही.