जळगाव.
: हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांची जयंती निमित्त सर्वत्र कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येतो चोपडा शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्याच ठरवलं आज एक जुलै हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रतिमेपूजन नंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पारंपारिक शेतीसाठी लागणारे साहित्य बैलगाडीवर ठेवून शेतकऱ्यांनी डोक्यावर जय जवान जय किसान चे टोप्या परिधान करून देशभक्तीपर गीत व शेती लगत गीत वाजत गाजत ही मिरवणूक बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शनी मंदिर चौक मेन रोडाने गुजराती गल्ली चिंच चौक थाळनेर दरवाजा मार्गाने नगरपरिषदेचे नाट्यगृहात येथे समारोप करण्यात येणार आहे दरवर्षी कृषी दिवस येत असतो परंतु तो एक छोटा खाणी साजरा केला जात असायचा यावर्षी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कृषी दिवस आग्रा वेगळा साजरा करण्याच ठरवलं आणि मोठ्या उत्साहात आनंदात कृषी दिवस साजरा करण्यात येत आहे.
.