भुसावळ शहरात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेच्या तारा तुटल्या
तुटलेल्या तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी विश्रामगृहासमोरील वाहतूक वळवली एकेरी मार्गावरून
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Ancr भुसावळ शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शासकीय विश्रामगृह समोरील विजेच्या तारा तुटल्या असून मात्र तुटलेल्या तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी विश्रामगृहासमोरील वाहतूक तात्काळ एकेरी मार्गावरून वळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत नागरिकांनी महावितरण विभागाला माहिती देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखेर तुटलेल्या तारांचा वीज पुरवठा खंडित केला.