जळगाव
वेल्हाळा तलावात जलसाठा पोहचला 60 टक्क्यांवर
उन्हाळ्यात कोरडा पडलेला वेल्हाळा तलाव पुन्हा भरल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद
भुसावळ तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून पाऊस सुरू असून या पावसामुळे वेल्हाळा तलावात पाण्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत तलावातील पाणीसाठा हा 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. उन्हाळ्यात वेल्हाळा तलाव कोरडा पडल्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली होती मात्र धरणात पाण्याची आवक वाढल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.