ऐन खरीप हंगामात योजना जाहीर करून शेतकऱ्यांसमोर उभे केले निंदणी कामाचे संकट

Muktai
1 Min Read

JAMNER SHETI MAJDUR

जामनेर

ऐन खरीप हंगामात योजना जाहीर करून शेतकऱ्यांसमोर उभे केले निंदणी कामाचे संकट

लाडकी बहिण योजना आली अन् शेतात महिला शेतमजुरांचा निर्माण झाला तुटवडा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शेतातील मजुरीची कामे सोडून ऑनलाईन सेंटर तथा महा-ई-सेवा केंद्रांमसोरीला लाइनीत रांगा लावत आहे. ऐन हंगामात योजना सुरु केल्याने महिला मजूर उपलब्ध होत नाही, निंदणीची कामे लांबणीवर पडत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागत आहे.

शेतकरी अडचणीत गेल्या काही वर्षांपासून शेती हा व्यवसाय धोक्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अपेक्षेनुसार मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वाढत्या महागाईनुसार मजुरीत वाढ करावी लागण्याची शक्यता आहे. ही वेळेवर न केल्यास पुढील परिस्थिती काही अंशी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते मजुरांच्या दृष्टीने योग्यच पण शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहे.

Share This Article
Leave a comment