मुक्ताईनगर च्या कु-हा काकोडा येथे समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रामस्थांनी केली साजरी….
यावेळी ग्रामस्थ एकत्रित अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करत असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना समाजसेवक राजू मानकर यांच्या वतीने वही पुस्तके वाटप केली यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावेळी सरपंच बि. सी .महाजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील राजू मानकर पंकज पांडव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजन करत अभिवादन केले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर राजू भाऊ मानकर यांनी प्रकाश टाकत मार्गदर्शन केले यावेळी सतीश नागरे अविनाश वाडे दिलीप भोलनकर रवि राजपूत प्रवीण शिंपी व पत्रकार गजानन खिरडकर रवी हिरोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते