आमदारांच्या या उपक्रमाने शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला असून आमदारांचेही सर्वत्र कौतुक शेतकरी वर्गाकडून केले जात आहे
मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चातून शंभर किलोमीटरचे मागील त्याला शेती रस्ता देण्याचा उपक्रम तालुक्यात जवळपास 100 रस्ते पूर्ण केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे…
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या उपक्रमाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केळी पट्टा व शेत शिवाराकडे शेतकऱ्यांना जाणे कठीण झाले होते मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची नाळ असलेल्या रस्त्याच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करत मागील त्याला शेत रस्ता देण्याचा उपक्रम तालुक्यात राबवला आहे त्यामुळे आमदारांच्या निवासस्थानी शेती रस्ते करण्याबाबत शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आमदारांनी यात जातीने लक्ष घालत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर झाले आहे त्यामुळे केळी पट्ट्याचा विकास यानिमित्त झाल्याचे बोलले जात आहे या कौतुकस्पत आमदारांच्या कामगिरीमुळे शेतकरी वर्ग खुश झाला आहे
केळी सह अनेक शेतीमाल वाहतूक थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचत आहे याच उपक्रमासाठी आमदारांनी एक टीम तयार करून हा उपक्रम हाती घेतला आहे मतदारसंघात शेती रस्त्याचे कामे होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला असून आमदारांचेही सर्वत्र कौतुक शेतकरी वर्गाकडून केले जात आहे
शेतकऱ्यांना केळी वाहतूक करताना मोठी समस्या निर्माण झाली होती मात्र आमदारांनी हा उपक्रम राबवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आमदाराच्या निवासस्थानी या उपक्रमाने शेतकरी आमदाराच्या निवासस्थानी गर्दी करीत आहे