प्रतिनिधी आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2024
-मुक्ताईनगर तालुक्यात आदिवासी कोळी समाज बांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी समाजसेवक नितीन कांडेलकर यांच्या नेतृत्वात सलग 21 दिवस तहसील कार्यालयावर विविध आंदोलने करत बिराड मोर्चा तसेच ठिय्या आंदोलन पुकारलेले होते मात्र प्रशासनाने याबाबत आश्वासन देत काही प्रमाणात जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते त्यानंतर या 21 दिवसाच्या या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती मात्र आश्वासनाची पूर्तत्व प्रशासनाकडून न झाल्याने पुन्हा आंदोलन करते नितीन कांडेलकर यांनी आज असंख्य आदिवासी कोळी समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसील प्रशासनाला निवेदन देत प्रलंबित जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी करण्यात आली अन्यथा पुन्हा दोन ते तीन दिवसा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन यावेळी करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते